आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महामारी:गेल्या चोवीस तासांत 55 बळी; 3225 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात, 3780 बाधितांची भर

नगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारात शनिवारी असा पोलिस बंदोबस्त होता.

कोरोनामुळे चोवीस तासांत जिल्ह्यातील ५५ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी रुग्णसंख्येत ३ हजार ७८० ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २३ हजार ३०२ झाली आहे. दरम्यान, ३,२२५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३० हजार ९३८ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.९३ टक्के आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनामुळे तब्बल ५५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नोडल अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे कोरोनाचे संकट अधिकच तीव्र झाले आहे. मृतांमध्ये काही तरुणांचाही समावेश आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९९९, खासगी प्रयोगशाळेत ११०१ आणि अँटीजेन चाचणीत १६८० बाधित आढळले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये मनपा हद्दीतील २०७, अकोले ६४, जामखेड १०७, कर्जत ६१, कोपरगाव ४७, नगर ग्रामीण ३९, नेवासे ४४, पारनेर ८७, पाथर्डी ४६, राहाता ६९, राहुरी ९, संगमनेर ९२, शेवगाव ३७, श्रीगोंदे ₹६, श्रीरामपूर ४८, कॅन्टोन्मेंट बोर्ड २६, मिलिटरी हॉस्पिटल ८ आणि इतर जिल्ह्यातील २ रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा ५०१, अकोले ११, जामखेड ३, कर्जत १३, कोपरगाव ११, नगर ग्रामीण १२२, नेवासे १८, पारनेर ५, पाथर्डी २७, राहाता ९७, राहुरी २३, संगमनेर १३३, शेवगाव २१, श्रीगोंदे १०, श्रीरामपूर ६७, कॅन्टोन्मेंट बोर्ड २७, इतर जिल्हा ११ आणि इतर राज्यांतील १ रुग्णाचा समावेश आहे. अँटिजन चाचणी मनपा २६२, अकोले ४०, जामखेड २८, कर्जत ६३, कोपरगाव ९३, नगर ग्रामीण २१५, नेवासे १८४, पारनेर ९३, पाथर्डी ३५, राहाता १४१, राहुरी १५१, संगमनेर ७२, शेवगाव ८१ श्रीगोंदे १३९, श्रीरामपूर ४३, कॅन्टोन्मेंट बोर्ड २६ आणि इतर जिल्ह्यांतील १४ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, मनपा हद्दीतील ८६६, अकोले १३६, जामखेड ४८, कर्जत २३४, कोपरगाव १५०, नगर ग्रामीण ३३५, नेवासे ९५, पारनेर ९६, पाथर्डी ९८, राहाता २७२, राहुरी १८४, संगमनेर १८४, शेवगाव १६४, श्रीगोंदे ४५, श्रीरामपूर १८८, कॅन्टोन्मेंट ६२, मिलिटरी हॉस्पिटल १३.

लसीकरण केंद्रांवर गर्दी
नगर शहरात मनपाच्या लसीकरण केंद्रांवर, कोरोना तपासणी केंद्रांवर दररोज गर्दी होते. लस घेण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत. लक्षणं आढळल्यास नागरिक स्वतः तपासणी करून घेण्यासाठी केंद्रावर जात आहेत. त्यामुळे गर्दी होऊन नियोजन कोलमडते. बऱ्याचदा केंद्रावरील कर्मचाऱ्यांना गोंधळामुळे सेवा देताना अडचणी निर्माण होतात.

आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा ५०१, अकोले ११, जामखेड ३, कर्जत १३, कोपरगाव ११, नगर ग्रामीण १२२, नेवासे १८, पारनेर ५, पाथर्डी २७, राहाता ९७, राहुरी २३, संगमनेर १३३, शेवगाव २१, श्रीगोंदे १०, श्रीरामपूर ६७, कॅन्टोन्मेंट बोर्ड २७, इतर जिल्हा ११ आणि इतर राज्यांतील १ रुग्णाचा समावेश आहे. अँटिजन चाचणी मनपा २६२, अकोले ४०, जामखेड २८, कर्जत ६३, कोपरगाव ९३, नगर ग्रामीण २१५, नेवासे १८४, पारनेर ९३, पाथर्डी ३५, राहाता १४१, राहुरी १५१, संगमनेर ७२, शेवगाव ८१ श्रीगोंदे १३९, श्रीरामपूर ४३, कॅन्टोन्मेंट बोर्ड २६ आणि इतर जिल्ह्यांतील १४ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, मनपा हद्दीतील ८६६, अकोले १३६, जामखेड ४८, कर्जत २३४, कोपरगाव १५०, नगर ग्रामीण ३३५, नेवासे ९५, पारनेर ९६, पाथर्डी ९८, राहाता २७२, राहुरी १८४, संगमनेर १८४, शेवगाव १६४, श्रीगोंदे ४५, श्रीरामपूर १८८, कॅन्टोन्मेंट ६२, मिलिटरी हॉस्पिटल १३.

मृत्यूचे तांडव सुरूच
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दररोज सरासरी ४० हून अधिक जणांचा मृत्यू होत आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ ते शनिवारी सायंकाळी ६ या चोवीस तासांत जिल्ह्यात तब्बल ५५ जणांचा मृत्यू झाला आहे, ही बाब चिंताजनक आहे.

शहरात ९७० रुग्ण अन् ५० अंत्यविधी
कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असून नगर शहरात शुक्रवारी २४ तासांत ९७० नवे रुग्ण आढळून आले. शहराची परिस्थिती बिकट होत असून फैलाव अद्याप नियंत्रणात आलेला नाही. २४ तासांत अमरधामात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ५० जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. २० जणांवर विद्युतदाहिनीत, तर ३० जणांवर लाकडाच्या सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून मनपाने पथकांची नियुक्ती केली आहे. अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली गर्दी करून प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर या पथकाकडून कारवाई सुरू आहे. आतापर्यंत साडेतीन लाखांचा दंड महापालिकेने वसूल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...