आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम आदमी पार्टी लढवणार असल्याचे माजी मंत्री महादेव नाईक यांनी जाहीर केले. नेवास तालुक्यातील जिल्हा परिषद - पंचायत समिती तसेच नगरपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात आपचे गोवा राज्याचे माजी उद्योगमंत्री व महाराष्ट्र निवडणूक प्रभारी महादेव नाईक यांनी नगर येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत आढावा घेतला. अॅड. सादिक शिलेदार व शिष्टमंडळाशी चर्चा करुन होणाऱ्या निवडणुका पुर्ण ताकदीने लढवण्याचा आदेश माजी मंत्री नाईक यांनी यावेळी दिला.
व्यासपिठावर प्रमुख अतिथी आपचे प्रदेशाध्यक्ष रंगादादा राचुरे, राज्य सरचिटणीस धनंजय शिंदे,जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल,नेवासा निवडणूक निर्णय समितीचे प्रमुख अॅड.सादिक शिलेदार,नेवासा तालुकाध्यक्ष राजू आघाव उपस्थित होते. माजी मंत्री नाईक म्हणाले, नगर जिल्ह्याला ऐतिहासिक व राजकियदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे जनसामान्यासाठी कामाचे योगदान मोठे आहे सर्वसामान्य माणसांचे मुलभुत प्रश्न सोडविणे हाच पक्षाचा हेतू असून सामान्यांना न्याय देण्यासाठी होणाऱ्या जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्व ताकदीनिशी निवडणूक लढवून गोरगरीबांच्या अडीअडचणी सोडवण्यावर भर देण्याचा आदेश बोलताना नाईक यांनी दिला.
यावेळी नेवासे तालुका निवडणुक निर्णय प्रमुख अॅड शिलेदार यांनी पक्षाच्या कामकाजाची माहीती यावेळी मान्यवरांना देऊन या निवडणुकीसाठी पक्षाने दिलेला आदेश मानून सर्व गण व गटात आप उमेदवार देणार आहे, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.