आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्याचे युग हे स्पर्धात्मक युग आहे. मुलांना केवळ शालेय अभ्यासच नव्हे तर इतरही बौद्धिक क्षमता विकास साधनांचाही वापर करणे गरजेचे आहे. गणिताच्या विविध संकल्पना समजून घेणे व त्यांचा व्यवहारात उपयोग करणे, तसेच शालेय स्तरावरील शिक्षणाला सहाय्यक म्हणून अबॅकस हे अत्यंत महत्त्वाची शिक्षण पद्धती आहे, असे प्रतिपादन आयुष मंत्रालयाचे संयुक्त नियंत्रक तथा वित्तीय सल्लागार डाॅ. महेश दळे यांनी केले.
राहुरीच्या अबॅकस मास्टर ट्रेनर अर्चना बनकर यांनी लिहिलेल्या फाउंडेशन लेव्हल पुस्तकाचे प्रकाशन डॉ. दळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बाेलत हाेते. या कार्यक्रमाचे आयोजन आचार्य रिसर्च इन्स्टिट्यूटने केले होते. अबॅकस या गणितीय पद्धतीचा वापर केल्याचा उल्लेख इजिप्त, चीन तसेच जपान या देशांमध्ये पूर्वीच्या काळात आढळतो. आपल्याकडेही वैदिक गणित पद्धती होतीच.
या पद्धतीचा वापर जपानने लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी व्यापक स्वरूपात केला आहे.जपानचा विकास व तेथील उच्च दर्जाचा मानव विकास निर्देशांकावरून असे सूचित होते की ही शिक्षण पद्धती फारच मोलाची आहे. आजच्या काळामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटरचा वापर करतो. मोबाईलमध्ये हे कॅल्क्युलेटर आपल्याला सहजपणे उपलब्ध असते. त्यामुळे आपण गणित करण्याची मेंदूची क्षमता हरवून बसलो आहोत. अशा काळात आपल्या मेंदूच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गणित या विषयांमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी मुलांना अबॅकस शिकणे गरजेचे आहे, असे दळे म्हणाले.
यावेळी पुस्तकाच्या लेखिका अर्चना बनकर यांनीही मनाेगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन बनकर होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की ज्या मुलांना यापूर्वी गणित हा विषय अवघड वाटत असेल, अबॅकसच्या ज्ञानाने त्यांना तो अत्यंत सुलभ वाटतो. शाळेमध्ये जाण्याची भीती किंवा परीक्षांची भीती त्यांच्या मनातून दूर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.