आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:देवाला घेऊन जातो असे सांगून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण; तिघांवर गुन्हा दाखल

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवाला घेऊन जातो असे सांगुन १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरणाची घटना राहुरी तालूक्यातील कणगर येथे घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.या घटने बाबत मुलीच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी तालुक्यातील कणगर परिसरात तिच्या आई वडिला सोबत राहते.

३१ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता ती अल्पवयीन मुलगी तिच्या आई वडिलांच्या कायदेशीर रखवालीत असताना या घटनेतील तिघांनी देवाला घेवुन जातो, असे सांगून फिर्यादीचे घरून मुलीला घेऊन गेले. दोन दिवसांचा कालावधी उलटूनही मुलीस परत घरी घेऊन आले नाही. संबधित तिघांनी माझ्या अल्पवयीन मुलीला लग्न लावण्याच्या उद्धेशाने घेऊन गेल्याचा मुलीच्या आईला संशय आला. मुलीच्या आईने राहुरी पोलिसात हजर होवुन घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या फिर्यादीवरून वडनेर तालुका राहुरी येथील ३ जणांवर अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी पसार झाले अाहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मधकुर शिंदे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...