आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:आरडगाव येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण; तीन जणांवर गुन्हा दाखल

राहुरी शहर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरडगाव येथे अकरावीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून तिला तिघा जणांनी मोटरसायकलवर बसवून पळवून नेले. १६ जून रोजी मध्यरात्री ही घटना घडली असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

आरडगाव परिसरात ती १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी इयत्ता अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. १६ जून रोजी मध्यरात्री तीन वाजे दरम्यान तीन आरोपींनी मिळून त्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून मोटरसायकलवर बसवून पळवून नेले. त्या मुलीच्या आई-वडिलांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. त्या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत संशयित आरोपी म्हणून दत्तात्रय कैलास मोरे, किशोर साळुंखे, शरद सोनवणे (तिघे रा. वरखेड, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) या तिघांवर अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार महादेव शिंदे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...