आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:घरगुती वादातून आठ वर्षीय मुलाचे अपहरण; स्थानिक गुन्हे शाखेने बारा तासांत लावला शोध

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केदारी वस्ती परिसरातून अपहरण झालेल्या ८ वर्षीय मुलाचा १२ तासात शोध घेऊन त्याला सुखरूप नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे.

नगर सोलापूर रोडवरील केदारे वस्ती येथून अश्विन परसराम क्षेत्रे या आठ वर्षीय मुलाचे रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अपहरण केले होते. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. नागेश चंद्रभान भिंगारदिवे (रा. दरेवाडी, ता.नगर) याला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली. तसेच पोलिस कारवाईच्या भीतीने त्याने सर मुलाला नगर रेल्वे स्टेशन वरून एका रेल्वेमध्ये बसवून दिल्याचे तपासात समोर आले.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. पुणे रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही पुण्याला रवाना झाले. सोमवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण झालेल्या मुलाला ताब्यात घेतले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या मुलाला नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले. घरगुती वादातून नातेवाईकानेच हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच गुन्ह्यात मदत करणाऱ्या आरोपीच्या एका नातेवाईकाला ही या गुन्ह्यात वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिस अधीक्षक मनोज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस अंमलदार दत्ता हिंगडे, रोहित येमुल, विशाल दळवी, संदीप घोडके, चंद्रकांत कुसळकर, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, एस. सी. फकीर, दिनेश मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...