आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:वांबोरी येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वांबोरी येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे. १७ डिसेंबरला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वांबोरी येथे ही घटना घडली. याप्रकरणी राहुरी पोलिसात अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इयत्ता ७ वी मध्ये शिक्षण घेणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आई वडीलांसोबत राहते. १७ डिसेंबरला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बाथरुमला जाते, असे सांगून घरातुन बाहेर पडली मात्र ती परत न आल्याने मुलीच्या पालकांनी व नातेवाईकांनी तिचा गावात, नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. तिला कोणीतरी अज्ञात इसमाने पळवुन नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिली.

बातम्या आणखी आहेत...