आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानी स्पर्धेचे आयोजन:एबीएमचा वैभव शेळके  200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय

संगमनेर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत एबीएम कॉलेज गुंजाळवाडी पठारचा विद्यार्थी वैभव शेळके यांनी २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) अंतर्गत आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धा लोणी येथे पार पडल्या. स्पर्धेत १० जिल्ह्यातील ३८ संघातून ३६४ खेळाडू सहभागी झाले होते. धावणे, लांब उडी, उंच उडी, रिले, गोळा फेक, भालाफेक आदी मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. आर. एस. गुंजाळ वेलफेअर फौंडेशन संचलित एबीएम कॉलेजमध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेला वैभव शेळकेने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला. त्याला क्रीडा शिक्षक ए. बी. ढेरंगे यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम गुंजाळ, सचिव राहुल गुंजाळ, प्राचार्य डॉ. जयसिंग लामटूळे यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...