आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:समाजासाठी निरपेक्ष सेवा हेच रोटरीचे तत्व, डॉ. रवी वदलमानी यांचे प्रतिपादन

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोटरी क्लबचा प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

समाजासाठी निरपेक्ष सेवा हे रोटरीचे तत्व आहे. आपल्या कार्यातून कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद फुलतो यासारखे दुसरे समाधान नाही. प्रत्येक रोटरीयनने सेवेचे मोठे स्वप्न पहावे व ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. यातून चांगली अंमलबजावणी झाल्याचे नक्कीच दिसून येईल, असे प्रतिपादन पीडीजी डॉ. रवी वदलमानी यांनी केले.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चा दोन दिवसीय स्मार्ट डिस्ट्रिक्ट टिम प्रशिक्षण सेमिनार नगरमध्ये उत्साहात पार पडला. जवळपास ११ जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे मिळून ३५० हून अधिक पदाधिकारी या सेमिनारमध्ये सहभागी झाले होते. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलने सेमिनारसाठी पीडीजी राज्यलक्ष्मी वदलमानी, रत्ना प्रभाकर, हरिष मोटवानी, शिरीष रायते, पीडीजी विष्णू मोंढे, प्रमोद पारीख, डीजीएन स्वाती हेरकल, डीजी डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, डीजीई रूख्मेश जाखोटिया, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष ईश्वर बोरा, सचिव डॉ.दिलीप बागल, संयोजक डॉ.एस.व्ही.जोशी, सहसंयोजक राजेश परदेशी उपस्थित होते. या सेमिनारमध्ये रोटरीचे उद्दिष्ट, सेवाकार्य, विविध उपक्रमांचे नियोजन आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संजोग लॉन्स येथे झालेल्या सेमिनारमध्ये डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी रोटरी सद्यस्थिती व पुढील वाटचाल, रूख्मेश जाखोटिया यांनी जेनफर जोन्स इमॅजिन रोटरीबाबत व्हिडिओ रुपात संदेश दिला. राज्यलक्ष्मी वदलमानी यांनी मेंबरशिप डेव्हलपमेंटबाबत विवेचन केले. रत्ना प्रभाकर, ईश्वर बोरा यांनी यांनी मनोगत व्यक्त केले. सेमिनारच्या नियोजनासाठी फर्स्ट लेडी रो. मिनल बोरा, डॉ. निलम बागल, हरिश नय्यर, अॅड. प्रसन्ना खासगीवाले, हितेश गुप्ता, वैजयंती जोशी, मधुबाला चोरडिया, नीलम परदेशी, स्वाती गुंदेचा, डॉ. श्रेया खासगीवाले, मनीष बोरा, अतुल बोरा, विजय जुंदरे, सतीश कटारिया, अजय गांधी, दत्ता दीक्षित, गणेश शहा, धीरज मुनोत, तेजस टाक, महेश गुंदेचा, सुनील कटारिया, मनोज मुथा, कृष्णा घोरपडे आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...