आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात:लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर ओळख झालेल्या युवतीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित युवती गर्भवती राहिल्यानंतर तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपात करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश अर्जुन दहिफळे (रा. नांदुरनिंबा दैत्य, ता. पाथर्डी) याच्यावर अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळची अमरावती जिल्ह्यातील फिर्यादी युवती सध्या पारनेर तालुक्यातील एका कंपनीत नोकरीला आहे. जूनमध्ये इंस्टाग्रामवर तिची ओळख ऋषिकेश दहिफळे सोबत झाली. त्यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळले. ऋषिकेशने युवतीचा विश्‍वास संपादन करून नगर येथे त्याच्या बहिणीकडे बोलून घेतले. युवती त्याच्यावर विश्‍वास ठेऊन नगरमध्ये आली असता तिला बहिणीकडे घेऊन न जाता नगर शहरातील एका लॉजवर नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवून पीडित युवतीची इच्छा नसतानाही तिच्यासोबत संबंध ठेवले.

युवतीने त्याच्याकडे लग्न करण्याबाबत विचारणा केली असता घरच्यांना विचारून त्यांची परवानगी घेऊन आपण लग्न करू, असे त्याने सांगितले. पीडित युवती गर्भवती झाली असता त्याने बळजबरीने गर्भपात करण्याच्या गोळ्या खाण्यास दिल्या. पीडितीने प्रेमसंबंधाची माहिती तिच्या घरच्यांना दिल्यावर घरच्यांनी लग्नाची परवानगी दिली. मात्र, युवतीने ऋषिकेशकडे लग्नासाठी विचारणा केल्यावर तू वेगळ्या जातीची आहे, असे सांगून लग्न करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...