आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास कोठडी

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तीच्या वारंवार अत्याचार करणारा अजमोद्दीन शेख राहणार कात्रड याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला गजाआड करण्यात आले. या आरोपीला सोमवारी नगर न्यायालयात उभे केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मार्च ते डिसेंबर २०२२ या कालावधीत अजमोद्दीन याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. ही मुलगी गरोदर राहून तिची १५ डिसेंबरला प्रसुती झाल्याने मुलीने घरच्यांना अत्याचाराची घटना सांगितली.

या घटनेची कुठे वाच्यता केल्यास तुझी बदनामी करेल, अशी धमकी अजमोद्दीन याच्याकडुन संबंधीत मुलीला देण्यात आली होती. दरम्यान, पिडीत मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अजमोद्दीन महंमद शेख रा. कात्रड, तालुका राहुरी, याच्या विरोधात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलमानुसार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अजमोद्दीनला गजाआड केले. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक खोंडे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...