आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अभाविपचा उप्रकम; पुष्पवृष्टी करून यात्रेचे स्वागत

जामखेड7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड शहराच्या इतिहासामधील पहिली तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. यात १११ फुटी तिरंगा ध्वज होता. या पदयात्रेत जामखेडकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अखिल विद्यार्थी भारतीय परिषदेने या पदयात्रेचे आयोजन केले होते. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाले या निमित्त देशात “हर घर तिरंगा’ हे अभियान चालवले जात आहे. बुधवारी (३ ऑगस्ट) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्डपासून १११ फूट लांबीचा तिरंगा ध्वज यात्रा सुरू झाली. या यात्रेचे जामखेडकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. जामखेड महाविद्यालय परिसरात यात्रेची सांगता झाली.

या कार्यक्रमास माजी सैनिकांसह अभाविप दक्षिण नगर जिल्हा संयोजक अथर्व पाडळे यांनी यात्रेच्या आयोजनाचा उद्देश सर्वांसमोर मांडला. अभाविप नगर विभाग संघटनमंत्री ओंकार मगदूम म्हणाले, अभाविप अमृतमहोत्सवी वर्ष व येणाऱ्या काळातील अभाविप करत असलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली.छात्रशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. आजचा विद्यार्थी आजचाच नागरिक आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने समाजाला ज्या ज्या वेळी आवश्यकता असेल त्या वेळी कार्य तत्पर रहावे.

या यात्रेच्या नियोजनामध्ये दक्षिण नगर जिल्हा संघटनमंत्री चेतन पाटील, विवेक कुलकर्णी, शिवनेरी अॅकेडमीचे लक्ष्मण भोर व त्यांचे विद्यार्थी, ल. ना. होशींग विद्यालय व जामखेड महाविद्यालय जामखेडचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश मोरे, सुरज निमोणकर, अविराज डुचे, प्रथमेश कोकणे, कुणाल खटके, जय देशपांडे, ऋषिकेश ठांगील,ओम मोरे, कृष्णा बुरांडे, निखिल आवारे, साहिल भंडारी, शुभम धनवडे, प्रसाद होशींग, गणेश पवार, निखिल अवारे, लहू राऊत, योगेश हुलगुंडे, गौरव समुद्र ,आश्विन राळेभात, अभिनव कटारिया, सौरभ पवार, आदी विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...