आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप समारंभ:ग्रामीण भागातील महत्त्वाची कामे केली गतिमान

नगर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांचे प्रतिपादन

नगरसारख्या मोठा भौगोलिक विस्तार असलेल्या जिल्ह्यात काम करताना मोठा अनुभव मिळाला. घरकुल योजना, आरोग्य यंत्रणा सक्षमीकरण, जलजीवन मिशन, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन या ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामांना गतिमान करण्याचा प्रयत्न केला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांची मुंबईला मंत्रालयात बदली झाली आहे. याबद्दल त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती सुनील गडाख, काशिनाथ दाते, उमेश परहर, मीरा शेटे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक सुनिल पठारे आदी उपस्थित होते. विविध संघटनांच्यावतीनेही क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.

क्षीरसागर म्हणाले, कोविड १९ सारखी महामारीशी सामना करताना जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केलेले काम अतुलनीय आहे, असे अभिमानाने सांगावे वाटते. या कार्यकाळात पदाधिकारी, सदस्य तसेच सहकारी अधिकारी यांचे सकारात्मक सहकार्य मिळाले. सूत्रसंचालन कांतीलाल ढवळे यांनी, तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी मानले. राजेंद्र क्षीरसागर यांची मंत्रालयात बदली झाली. याबद्दल त्यांना जिल्हा परिषदेतर्फे सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.

जनहिताच्या सर्व कामांत पदाधिकाऱ्यांना सहकार्य
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना क्षीरसागर यांनी सर्वांना सोबत घेऊन ठसा उमटवणारे काम केले आहे. शिस्तप्रिय असलेल्या क्षीरसागर यांनी जनहिताच्या सर्व कामांत पदाधिकाऱ्यांना सहकार्य केले. योजनांची अंमलबजावणी करताना अडचणीतून मात करण्यासाठी समन्वय साधला, असे अध्यक्ष घुले म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...