आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामांना गती:थोरात यांच्या पुढाकारातून निळवंडेच्या जलसेतू व कालव्यांच्या कामांना गती

संगमनेर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण ध्यासपर्व मानून पूर्ण केले. कालव्यांच्या कामांचा ते रोज आढावा घेत आहेत. अकोले तालुक्यातील जलसेतूसह डाव्या व उजव्या कालव्याच्या कामांना त्यांनी गती दिली.

निळवंडे धरण उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी वरदान ठरणार आहे. जीवनाचे ध्येय मानून मंत्री थोरात यांनी अनेक अडचणींचा सामना करत धरण पूर्ण केले. मविआ सत्तेवर आल्यानंतर धरण कालव्यांच्या कामासाठी मोठा निधी मंजूर करून घेतल्याने कामासाठी दोनच्या ठिकणी पस्तीस जेसीबीसह मोठी यंत्रणा कार्यान्वित झाली. कोरोनातही २४ तास कालव्याची कामे वेगाने सुरू होती. निळवंडेच्या डाव्या व उजव्या कालव्यातून ऑक्टोबर २०२२ मध्ये दुष्काळी भागाला पाणी देण्याचे मंत्री थोरात यांचे प्रयत्न आहे. कालव्यांची कामे पूर्णत्वाकडे असून नदीवरील पूल, रस्ते व ओढ्या नाल्यांवरील स्ट्रक्‍चरल कामे अंतिम टप्प्यात आहे. अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील जलसेतू या भव्यदिव्य कामाची पाहणी त्यांनी केली असून या कामालाही गती दिली.

बातम्या आणखी आहेत...