आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:नेवासे फाटा येथे रस्त्यावर धुळीमुळे वाढले अपघात

नेवासेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे फाटा या जीव घेण्या खड्ड्यांच्या रस्त्याची डागडुजी केल्यानंतर रस्त्यावर कचखडी तशीच असल्यामुळे नेवासे फाटा येथून नेवाशाकडे जातांना वाहनधारक या रस्त्यावरुन प्रवास करतांना ठेकेदाराच्या चुकीमुळे वाहनधारकांच्या डोळ्यात धुळ जावून अनेक अपघात घडत आहेत. या रस्त्याच्या दुतर्फा असलेले व्यवसाय सध्या या प्रचंड धुळीमुळे बंद असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या वतीने नेवासे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

वाहने सुरू असल्यामुळे प्रचंड प्रमाणात उडत असल्यामुळे अनेकांच्या डोळ्यात धुळ जावून अपघात घडलेले आहेत. याबाबत नेवासा तहसिलदारांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा चिडलेले ग्रामस्थ आक्रमक होण्याचा अधिक धोका नाकारता येत असून रस्त्याची धुळ नाहिशी करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा विवेक नन्नवरे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला.

बातम्या आणखी आहेत...