आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:कर्तृत्ववान महिलांचा‎ ‘व्यंकटेश’तर्फे सन्मान‎

नगर‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्री शक्ती ही सर्वात मोठी ताकद आहे.‎ आई, बहीण, पत्नी अशा कितीतरी भूमिका‎ बजावताना ती घराबाहेरही कर्तबगारी सिद्ध‎ करते. आज जीवनातील प्रत्येक क्षेत्रात‎ महिला आपले कर्तृत्व दाखवत आहेत.‎ जागतिक महिला दिनानिमित्त अशा‎ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करताना खूप‎ समाधान मिळाले, अशा भावना व्यंकटेश‎ मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन अभिनाथ‎‎ शिंदे यांनी व्यक्त केल्या.‎

व्यंकटेश मल्टीस्टेटच्या सर्व २२‎ शाखांमध्ये परिसरातील कर्तृत्ववान‎ महिलांचा सत्कार करण्यात आला. स्थानिक‎ शाखा अधिकारी, कर्मचारी यांनी‎ कार्यक्रमाचे नियोजन केले. गाव कारभार‎ पाहणाऱ्या सरपंच, भावी पिढी घडवणाऱ्या‎ शिक्षिका यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत‎ असलेल्या महिलांना सन्मान पूर्वक शाखेत‎ निमंत्रित करून गौरवण्यात आले.‌‎

बातम्या आणखी आहेत...