आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रफुल्ल शिंगाडे यांचे प्रतिपादन:घोलप यांनी पदाधिकारी बदलून शिवसेना संपवण्याचा विडा उचलला

कोपरगाव शहरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
बबन घोलप - Divya Marathi
बबन घोलप

संपर्कप्रमुख बबन घोलप यांनी कुठलेही कारण नसताना जिल्ह्यातील शिवसैनिकांचे पदे बदलून शिवसेना संपवण्याचे विडा उचलला आहे,घोलप यांच्यामुळे अनेक शिवसैनिक शिंदे गटात जात असून ४० वर्षांपासून जिल्ह्याप्रमुख राजाभाऊ झावरे शिवसेनेचे काम करत आहे. अश्या जुन्या शिवसैनिकांना डावलण्याचे काम केले जात असून नारायण राणे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली तेव्हा तत्कालीन आमदार अशोक काळे यांना राणे यांच्यासोबत नेणारे लभडेच होते. लभडे आमदार काळे यांचे स्वीयसहायक असताना देखील सेना संपवण्याचे काम केले. असे शिवसेना विरोध संपर्क प्रमुख बबन घोलप व जिल्ह्याप्रमुख प्रमोद लभडे यांची हकालपट्टी व्हावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रफ्फुल शिंगाडे यांनी शिवालय येथे पत्रकार परिषदेत केली.

नवनिर्वाचित संपर्क प्रमुख बबन घोलप यांनी जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख पदासह अनेक पदे पैसे घेऊन दिल्याचा आरोप करत माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या कार्यकर्त्यांनी निषेध नाटिका सादर करत जिल्हाप्रमुख प्रमोद लभडे व संपर्क प्रमुख बबन घोलप यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली.

यावेळी वाहतूक सेना जिल्हा प्रमुख इरफान शेेख माजी नगरसेविका वर्षा शिंगाडे,उपशहर प्रफुल्ल शिंगाडे, विकास शर्मा, प्रवक्ते राहुल देशपांडे, युवा सेना तालुका प्रमुख दिपक चौधरी, सुनील पुंडारे, शेखर कोलते, योगेश उशीर, मयूर दळवी, वैभव गिते, सतीश शिंगाने, जफर पठाण, मधुकर पवार, अक्षय नन्नावरे, रवी पवार, गौरव गुप्ता, उमेश छुगानी, विजय सोनवणे, करण दळवी, सुशील बोर्डे, भूषण वडांगळे, सतीश खर्डे, गोविंद चव्हाण, हिरालाल तवरेज, अशोक पवार, जाफर पठाण, श्रीपाद भसाळे, अभिषेक जाधव, अमोल तवरेज, प्रवीण शेलार, वसीम शेख आदी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी प्रवक्ते राहुल देशपांडे म्हणाले, बबन घोलप यांनी कोपरगावमध्ये किती दौरे केले. घोलप यांच्या उपस्थिती एकच मेळावा झाला तोही माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी घेतला. तसेच मुंबई येथून क्राईम ब्रँचचे अधिकारी शिवसैनिकांची चौकशी करण्यासाठी आले तेंव्हा २०० शिवसैनिकांसमवेत जिल्ह्याप्रमुख राजेंद्र झावरे उभे होते तेव्हा हे नुतून जिह्याप्रमुख कुठं होते.

बातम्या आणखी आहेत...