आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूळ संकल्पना:वेदपुराणांनुसार पाणवठ्यावर निर्मित रेतीचा दीड दिवसांचा बाप्पा शास्त्रोक्त

अश्विनी तडवळकर | सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वेदपुराणांनुसार अनंत काळापासून भाद्रपदातल्या गणपती उत्सवात वाहत्या पाण्याच्या पाणवठ्यावर बसून तिथल्याच रेतीने बाप्पांची मूर्ती घडवली जायची. तेथेच दीड दिवस त्याची पूजाअर्चा केली जायची. नंतर त्याच वाहत्या पाण्यात विसर्जन व्हायचे, अशी माहिती ज्योतिषाचार्य गुणेश दाते यांनी दिली. तत्कालीन राजकीय परिस्थितीत लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, मात्र शास्त्रोक्त मूळ संकल्पना ही दीड दिवसाच्या गणपतीचीच असल्याचे दाते म्हणाले.

भाद्रपातला गणपती हा केवळ दीड दिवसाचा असला तरी त्याची पूजाअर्चा गोड पदार्थ आणि साधना ही मात्र रीतसर करण्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना ज्योतिषाचार्य गणेश दाते म्हणाले की, पूर्वी समुद्र नदी किंवा इतर कोणत्याही प्रकारचा पाणवठ्याच्या काठावर गणेशमूर्ती साकारायचे. त्याला दुर्वा, लाल फुल, पुष्पहार असं सर्व साहित्य वाहून मनोभावे पूजा करायचे. मात्र हा गणपती केवळ दीड दिवसाचा असायचा. कोकणात याची आजही मोठ्या प्रमाणावर प्रचिती येते. सध्या सुरू असलेल्या गणपती उत्सवाला आता दहा दिवसांची परंपरा लाभली आहे. या बदललेल्या स्वरूपाचेही आताच्या काळात चांगल्या पद्धतीने व विधायक कार्याने आनंद घ्यावा, असे ते म्हणाले.

राशीस्वामी मंगळ तर आजन्म करा गणेशाची साधना : दाते
गणेश सौम्य किंवा तीव्र अशा सर्वांच्या राशींचा स्वामी आहे. त्यामुळे ज्यांच्या पत्रिकेत मंगळ आहे त्यांनी न चुकता गणेशाची आराधना करावी. ओम अंगारकाय नमः हा मंत्र दिवसातून किमान १०८ वेळा जपावा. दुर्वा वाहव्यात, अथर्वशीर्षाचे आवर्तन म्हणावेत. पत्रिकेत मंगळ असलेली व्यक्ती धाडसी असते. मात्र ती तितकीच तापट व बंडखोर असते. या राशीसाठी गणेश आराधना उपकारक ठरेल.

बातम्या आणखी आहेत...