आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील कोळपेवाडी येथून २ लाख रुपये किमतीचा चोरी गेलेला स्वराज ट्रॅक्टर व चोरणाऱ्या आरोपीस कोपरगाव तालुका ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले असल्याची माहिती कोपरगाव तालुका ग्रामीण पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली. ७ जून २०२२ रोजी रात्री ११ वाजे ते ८ जून २०२२ रोजीचे ४ वाजेच्या दरम्यान कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथून स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच १७ एव्ही ४२१६ हा चोरट्याने चोरुन नेला असल्याबाबत कोळपेवाडी येथील शेतकरी शाकीर हमीद सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी गुन्ह्याच्या तपासाचे चक्रे फिरवून चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा व आरोपीचा गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेऊन तपास केला. स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर चोरून नेणारा आरोपी दीपक चंद्रभान मोरे, वय ३२, रा. कोळगाव थडी यास पोलिसांनी १७ जून रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास सापळा रचून शिताफिने जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीस गेलेला दोन लाख रुपये किंमतीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर धारणगाव गावठाण येथील पडीत जागेत काटवणात लपवून ठेवलेला होता, तो हस्तगत करण्यात आला. ही कामगिरी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलत जाधव, पोलिस नाईक विलास कोकाटे, पोलिस कॉन्स्टेबल अविनाश तमनर, नवनाथ गुंजाळ व किसन सानप यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.