आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर एलसीबीची कारवाई:लिफ्टच्या बहाण्याने नाशिकच्या मायलेकींना नगरमध्ये लूटणारा आरोपी जेरबंद

अहमदनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

माय-लेकीला मारहाण करत लुटणार्‍या एकाला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. राहुल अशोक चव्हाण (वय 27 रा. जळकु ता. मालेगाव जि. नाशिक) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून रोख रक्कम, दुचाकी व मोबाईल असा 54 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पल्लवी प्रथमेस चिंचले (वय 30 रा. नाशिक) व त्यांची आई चांदणी चौक येथे सोलापूरला जाण्यासाठी उभ्या असताना दुचाकीवरून आलेल्या एकाला त्यांनी सोलापूरला जाण्यासाठी बस कुठे थांबते, अशी विचारणा केली. तो व्यक्ती त्यांना म्हणाला,‘बस पुढच्या चौकात थांबते, मी तुम्हाला सोडतो,’ असे म्हणून त्याने पल्लवी व त्यांच्या आईला निर्जन ठिकाणी घेऊन जात अन्य साथीदारांच्या मदतीने मारहाण करत रोख रक्कम, सोने, मोबाईल असा एक लाख 41 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल काढून घेतला होता. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदरच्या गुन्ह्यातील आरोपी संगमनेर- सिन्नर रस्त्यावरील साईखिंडी फाटा (ता. संगमनेर) येथे येणार असल्यची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार निरीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस अंमलदार सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, संदीप पवार, विजय वेठेकर, विश्‍वास बेरड, ज्ञानेश्‍वर शिंदे, शंकर चौधरी, संतोष लोढे आदींच्या पथकाने राहुल चव्हाण याला ताब्यात घेत अटक केली.