आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीस अटक:खुनासह अनेक गुन्ह्यांत हवा असलेला आरोपी चार महिन्यानंतर जेरबंद

कोपरगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव पोलिस ठाण्यात चार महिन्यांपूर्वी दाखल असलेल्या ऍट्रॉसिटी व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गणेश शंकर गावंड वय ३३, रा. मंजूर यास कोपरगाव पोलिसांनी शिताफीने पकडले, अशी माहिती पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी दिली. गुप्त बातमीदारातर्फे मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध कोपरगाव तालुक्याबरोबरच लगतच सिन्नर तालुक्यातील गावात शोध घेतला. त्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली.

हा आरोपी चार महिन्यांपासून फरार होता. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षाक दौलत जाधव, सहायक पाेलिस निरीक्षक सुरेश आव्हाड, हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, पोलिस नाईक कृष्णा कुऱ्हे, तसेच सायबर सेल श्रीरामपूर कडील पोलिस नाईक प्रमोद पवार, फुरकान शेख यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...