आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकांवर गुन्हे दाखल:ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी जिल्ह्यात 102 वाहन चालकांवर कारवाई

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दारू पिऊन वाहने चालवणाऱ्या १०२ वाहन चालकांविरोधात पोलिस प्रशासनाने कारवाया केल्या आहेत. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात पोलिसांकडून ठिकठिकाणी या कारवाया करण्यात आल्या. काही वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

सरत्या वर्षाला निरोप देऊन, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्हाभरातील हॉटेल व बारमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने नगर शहरासह जिल्हाभरात नाकेबंदी केली होती ते ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करून वाहन चालकांची तपासणी केली जात होती तपासणी दरम्यान नगर शहर व जिल्ह्यात दारू पिऊन वाहने चालवणाऱ्या १०२ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे ओला यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...