आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा पोलिस प्रशासनाने बुधवारी रात्री जिल्हाभरात नाकाबंदी करून मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. जिल्ह्यात २८ जणांवर ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. यात नगर शहरातील दोन जणांवर कोतवाली पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या आदेशानुसार नाशिक परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्री तीन तास नाकाबंदी करण्यात आली. यात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या विरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. जिल्ह्यातील बत्तीस ठिकाणी २७ अधिकारी व १३२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून वाहनांची व वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी जिल्ह्यात ५८१ वाहनचालकांची तपासणी केली.
यात मद्यप्राशन करून वाहन चालणाऱ्या २८ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान नगर शहरात कोतवाली पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या संदर्भात पोलिस कॉन्स्टेबल भरत गाडीलकर यांच्या फिर्यादीवरून राहुल अशोक गवळी (वय २३, रा. वाकोडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर पोलिस नाईक ए. पी. इनामदार यांच्या फिर्यादीवरून भरत अंकुश परभणे (वय १९, रा. बांदखेल, ता. आष्टी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे हे गुन्हे दाखल करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.