आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:सैनिकांच्या वर्दीची बेकायदेशीर खरेदी-विक्री केल्यास कारवाई

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सैनिकांच्या वर्दीची अनधिकृत खरेदी विक्री करणे, वापरण्यास मनाई आहे. अनधिकृत दुकानदाराने याची विक्री केल्याचे आढळल्यास सैन्य दलाकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. जवानांनी सोमवारी काही दुकानांना भेटी देत तपासणी करून त्यांना सूचना केल्या. यावेळी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस उपस्थित होते. भिंगार, दरेवाडी, वाकोडी फाटा येथील दुकानात सैनिकांच्या वर्दीची विक्री होत होती.

ही वर्दी परिधान करून आलेल्या तोतया व्यक्तींकडून फसवणूक केली जात होती. सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांची यामुळे फसवणूक झाली आहे. सेनेच्या मालकीची संपत्ती असलेल्या वर्दीची डिझाईन सेनेने तयार केलेली आहे. अधिकृत करारनामा केलेल्या दुकानातच वर्दीची विक्री करता येते. यासाठी सैन्य दलाने नियमावली तयार केली आहे. जवानांनी सोमवारी दरेवाडी, वाकोडी फाटा येथील काही दुकानांना भेटी दिल्या. तेथे दुकानदारांना सुचना करून यापुढे सैनिकांची वर्दी खरेदी करून विक्री करण्यासाठी मनाई केली. दुकानाचा परवाना रद्द करून, गुन्हा दाखल केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...