आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:दिल्लीगेट, चितळे रस्त्यावर अतिक्रमणांवर कारवाई

नगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिकेच्या माळीवाडा प्रभाग कार्यालय व मुख्यालयातील अतिक्रमण निर्मूलन विभागाने संयुक्त कारवाई करत शहरातील दिल्लीगेट, चौपाटी कारंजा व चितळे रोड परिसरातील अतिक्रमणे हटवली. खाद्यपदार्थांच्या गाड्या व पथरी व्यावसायिकांचे स्टॉल मनपाच्या पथकाने हटवले.

प्रभाग अधिकारी राकेश कोतकर अतिक्रमण निर्मूलन विभागाचे क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख माळीवाडा प्रभाग कार्यालयाचे नितीन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून दिल्ली गेट परिसरातून कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर चौपाटी कारंजा चौकात खाद्यपदार्थाच्या गाड्या व स्टॉल हटवण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत चितळे रस्त्यावर कारवाई सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...