आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेल:रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेल्सवर कारवाई; पोलिसांचा कारवाईचा इशारा

नगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाचे निर्देश डावलून रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कोतवाली पोलिस ठाणे अंतर्गत आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचा भाग म्हणून रात्री ११ नंतर सुरू असलेल्या हॉटेल व इतर आस्थापनांना नोटिसा बजावून कारवाई केली जाणार असल्याची माहिती निरीक्षक संपतराव शिंदे यांनी दिली. तसेच शहरात रात्री उशिरापर्यंत विनाकारण गट, जमाव, घोळका करून बसणाऱ्या युवकांवरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काळात नगर शहरामध्ये मोहरम, दहीहंडी व गणेशोत्सव आदी सण व उत्सव साजरे होणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी येत्या काळातील सर्व उत्सवांमध्ये अनुचित घटना घडणार नाही, यासाठी उपाययोजना सुरू केल्या. त्याचाच भाग म्हणून रात्री उशिरा फिरणाऱ्या, घोळका करून बसणाऱ्या युवकांवर कारवाई करण्यात येणार आहे. रात्री अकरानंतर सुरू ठेवल्या जाणाऱ्या हॉटेल्स व इतर आस्थापनांवर कारवाई करून खटले दाखल करण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...