आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:तनपुरेवाडी शिवारात अवैध वाळू उपशावर कारवाई

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध वाळू उपशावर कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन ब्रास वाळूसह दोन वाहने असा सात लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राहुरी तालुक्यातील डिग्रस व तनपुरेवाडी शिवारात सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरूध्द राहुरी पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार सुरेश माळी, लक्ष्मण खोकले, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, राहुल सोळुंके, रणजित जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. डिग्रस शिवारात मुळा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच पथकाने राहुरी पोलिस ठाण्याचे अंमलदार एस.बी.जायभाय, बी.बी.थोरात, एन.एम.शेख यांना सोबत घेत सापळा लावून वाहन पकडले. या प्रकरणी अंमलदार लक्ष्मण खोकले यांच्या फिर्यादीवरून भिमराज गुलाबराव बर्डे (वय २५ रा. बारागाव नांदूर ता. राहुरी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

तसेच, तनपुरेवाडी शिवारात राहुरीच्या दिशेने राजेंद्र गुंजाळ हा टेम्पोमधून वाळू वाहतुक करत असल्याची माहिती मिळताच पथकाने राहिबाई मंदिराजवळ सापळा लाऊन टॅम्पो पकडला. याप्रकरणी अंमलदार रणजित जाधव यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र अर्जुन गुंजाळ (वय २६ रा. मुलणमाथा, राहुरी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...