आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:कोरडगावात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरडगांव ते पाथर्डी दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाविरुध्द कारवाईकरुन आठ ब्रास वाळू व दोन डंपर असा २०.८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि दिनकर मुंडे, पोसई सोपान गोरे, मनोजर शेजवळ, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, शंकर चौधरी, संतोष लोढे, सचिन आडबल, विशाल दळवी, संदीप दरदंले, ज्ञानेश्वर शिंदे, शिवाजी ढाकणे, विनोद मासाळकर, रविंद्र घुंगासे, मच्छिंद्र बर्डे, सागर ससाणे, जालिंदर माने, रोहित येमुल, योगेश सातपुते, भागचंद बेरड व अर्जुन बडे यांनी विजय अशोक चेमटे (वय ३२, रा. शिंगोरी थाटेवडगांव रोड, ता. शेवगाव), गजेंद्र रघुनाथ भराट (वय १९, रा. तोंडोळी, ता. पाथर्डी), केशव रुस्तुम चेमटे (रा. शिंगोरी, ता. शेवगाव), तौफिक नदीम शेख (वय २६, रा. मुंगी, ता. शेवगाव), सुधीर संभाजी शिरसाठ यांच्याविरुध्द कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...