आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:‘कार्बाईडचा वापर करणाऱ्या फळे विक्रेत्यांवर कारवाई करावी’

श्रीरामपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक फळ विक्रेत्यांकडून आंबे, केळी व इतर फळे पिकवण्यासाठी कारबाईड व इथिलीनच वापर होतो. अशी फळे खाल्ल्यामुळे अनेक आजार होतात. त्यामुळे सामाजिक व ग्राहकहित लक्षात घेऊन अशा फळ विक्रेत्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी ग्राहक पंचायतीने केली.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य श्रीरामपूर शाखेच्या वतीने प्रांताधिकारी व तहसीलदार यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांना अध्यक्ष डॉ. गोरख बारहाते, रणजित श्रीगोड, संदीप अग्रवाल, कमल मुंदडा, अनिल कुलकर्णी, रमेश चंदन, चंद्रकांत कुलकर्णी, बन्सी फेरवाणी, भरत बाठिया आदींच्या सहीने निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, फळे पिकवण्यासाठी पाचरट व बंदिस्त जागेचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र, सर्रासपणे कार्बाईडचा वापर केला जातो.

त्यामुळे फळे लवकर पिकतात. मात्र, स्लो पॉयझनसारखे असून त्याचे दुष्परिणाम होतात. पचन संस्थेस अपाय होतो. आजकाल बंद खोलीत इथिलीन गॅसचा वापर करून फळे पिकवली जातात. त्यामुळे तालुकास्तरावर तहसीलदार यांनी अन्न व औषध प्रशासन यांच्या उपस्थितीत फळे विक्रेते, व्यापारी, ग्राहक पंचायतीचे सदस्य, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांचे उपस्थितीत बैठक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...