आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापा:603 दारुच्या हातभट्ट्यांवर कारवाई 49.36 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

नगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा पोलिस दलाच्या विशेष माेहिमेदरम्यान जिल्ह्यातील ६०३ अवैध दारु व गावठी हातभट्टी अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिस ठाण्यांनी संयुक्त कारवाई करत ६०३ आरोपीविरुध्द गुन्हे दाखल केले. कारवाईत ४९ लाख ३६ हजार १९८ रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

गणेशोत्सव व इतर सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १५ ऑगस्ट ते दिनांक ६ सप्टेंबर या कालावधीत अवैध दारु विक्रीविरुध्द विशेष मोहिम राबवण्यात आली. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणी व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे ही कारवाई केली. अवैध दारु, गावठी हातभट्टयांचा शोध घेऊन ५४२ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. ५४२ आरोपींना ताब्यात घेऊन २७ लाख ८ हजार ९१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट केला होता.

तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, संदीप पवार, पोलिस नाईक शंकर चौधरी, पोलिस कॉन्स्टेबल रंजीत जाधव, रवींद्र घुंगासे, राहुल सोळुंके, संदीप दरंदले, लक्ष्मण खोकले, पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे, रविकिरण सोनटक्के, संदीप घोडके, सचिन आडबल, ज्ञानेश्वर शिंदे, संभाजी कोतकर,

देवेंद्र शेलार, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, विशाल दळवी, दीपक शिंदे, विजयकुमार वेठेकर, शरद बुधवंत, भरत बुधवंत, दत्तात्रेय हिगडे, मच्छिंद्र बर्डे, विश्वास बेरड यांच्या पथकाने ६९ ठिकाणी छापे टाकून २२ लाख २७ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल, स्वाती भोर, जिल्ह्यातील सर्व पोलिस उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

तरीही दारूच्या भट्ट्या सुरूच अवैध दारुच्या भट्ट्यांवर पोलिसांनी वारंवार छापे टाकले आहेत. तरीही पुन्हा या हातभट्ट्या सुरू होत आहेत. यावरून अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचे भय वाटत नसल्याचे दिसून येत आहे. अशा हातभट्ट्या पुन्हा सुरू होऊ नयेत, यासाठी स्थानिक पोलिसांनीही दक्ष राहणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...