आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:आश्रम शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम आदर्शवत : तहसीलदार शेख

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी कामगारांना ऊबदार ब्लँकेटचे वाटप तसेच आश्रम शाळेतील मुलांना खाऊ वाटप हा यमनाजी आघाव यांनी राबवलेला उपक्रम समाजापढे आदर्शवत अाहे, असे प्रतिपादन राहुरीचे तहसीलदार फसिओद्दीन शेख यांनी केले. बारागाव नांदूर येथील यमनाजी आघाव यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

तहसीलदार शेख म्हणाले, कोरोनाच्या काळात देखील आघाव यांनी परप्रांतीय नागरीकांसाठी नाष्ट्याची सोय केली होती. शिवशाहीर विजय तनपुरे म्हणाले, आघाव नेहमीच दुरदृष्टीचे उपक्रम राबवितात. यावेळी मिरा बांगर,विठ्ठल खांदवे,यमनाजी आघाव यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास मुख्याधिकारी डाॅ.सचिन बांगर,सब रजिस्टर प्रविण कणसे, दिलीपराव आघाव,रामभाऊ काळे,सचिन आघाव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...