आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारुपेरी पडद्यावर खलनायक साकारणारा सोनू खऱ्या आयुष्यात मात्र लोकांचा हीरो झाला आहे. रिअल लाईफ हिरो म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. सोनू सूद कधीही लोकांना मदत करण्यापासून मागे हटला नाही. आता सोनूचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो उसाचा रस बनवताना दिसून येत आहे.
सोनू सूदनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. कोणाला उसाचा रस हवाय? एका ग्लासवर एक ग्लास रस फ्री. #supportsmallbusiness #shirdi.असं लिहित सोनूने छोट्या व्यवसायांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
सोनू सुदने नुकतेच शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी शिर्डी विमानतळावरून साई मंदिराकडे जात असताना रस्त्यात असलेल्या एका साई कृष्णा कोल्ड ड्रिंक्स आणि जनरल स्टोअरमध्ये थांबला. या दुकानामध्ये चहा, उसाचा रस आणि इतर काही वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी सोनू सूदचे हे मजेशीर क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
व्हि़डिओमध्ये 'हे आहे साईकृष्णा दुकान, हे एखाद्या शोरूमसारखे आहे. इथे चहा पण मिळतो, असे म्हणताना सोनू सूद दिसते. तर पुढे सोनू आलेल्या ग्राहकांना 'तुम्हाला काय पाहिजे?', असा विचारतो. त्यानंतर ते ग्राहक सोनूला ऊसाचा रस मागतात. नंतर सोनू स्वत:च्या हातानं ऊसाच्या रसाची मशीन सुरू करतो आणि रस तयार करायला सुरूवात करतो. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे सोनू सूदचा साधेपणा पुन्हा एकदा दिसून आला.
सोनूचे हे आगामी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस -
सोनू सुदचे 'फतेह' आणि 'पृथ्वीराज' हे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या शहीद या चित्रपटामधून सोनूनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांबरोबरच तो जाहिरातींमध्ये देखील काम करतो. दरम्यान सोनू सूड फाउंडेशनच काम जोरदार सुरूच आहे. अजूनही तो लोकांची सर्वतोपरी मदत करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.