आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:मोठ्या पडद्यावर ग्रामीण भागातील कलाकारांना वाव मिळावा; शिवशंकर राजळे यांचे प्रतिपादन

पाथर्डी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरडगाव येथील ग्रामिण भागातील कलाकारांनी अनेक वर्षापासून नाटक कला जोपासली असून कोरडेश्वर कला व नाट्य मंडळ या माध्यमातून कलाकारांनी अनेक उत्कृष्ट नाटके आजपर्यंत प्रकाशित व प्रदर्शित केली असून त्यांना प्रेक्षकांचा ही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी केले.

पाथर्डी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे काही कलाकार आले असता त्यांचे स्वागत करताना ते बोलत होते. ते म्हणाले, सुनिल शिंदे सारखा गरीब कुटूंबातील युवक मालिका तयार करतो, ही भूषणावह बाब आहे. ग्रामिण भागातील कलाकारांना अनेक अडचणी असतात. दिगंबर गाडे मित्र मंडळाचे यासाठी सहकार्य मिळत आहे.

यावेळी दिग्दर्शक सुनिल शिंदे, सहदिग्दर्शक तुषार जाधव, अभिजित जाधव, कलकार ज्ञानेश्वर भाबड, केत‌की गावडे, अवंतिका बडे, लतीफ शेख, शिवाजी बोंद्रे, भिमराव मिसाळ, रामा गोरे, जयश्री काळे यांच्यासह बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट, संचालक वैभव दहिफळे,बंडू बोरुडे, सिताराम बोरुडे, सुरेश मिसाळ, महेंद्र राजगुरू, आराख सर, आदी उपस्थित होते. वसंत वाघमारे यांना उत्कृष्ट पोलिस पाटील हा राज्यस्वरीय पुरस्कार व राजेंद्र पुंड यांची विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र काटे यांनी केले. सुत्रसंचलन वसंत बोर्डे यांनी केले. समाधान आराख यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...