आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक पातळीवर मका उत्पादकता सरासरी ५ टन असल्याने उत्पादकेते मधील हे अंतर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य तंत्रज्ञानाची जोड हवी, असे प्रतिपादन विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी केले.
राहुरी कृषि विद्यापीठ व वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत मका पिकाचे तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ.गडाख म्हणाले मका पिकाचा मानवी आहारा बरोबरच पोल्ट्री,पशुखाद्य, औद्योगीक आणि जैवइंधनासाठीही वापर होत आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये मका पिकाखाली सुमारे १२ लाख हेक्टर क्षेत्र अाहे. उत्पादकता प्रति हेक्टर ३ टन इतकी आहे. मका पिकाच्या क्षेत्र तसेच उत्पादनात महाराष्ट्राचा १० टक्के वाटा आहे. तो वाढवण्यासाठी तीनही हंगामात मका हे पीक भर घालू शकते. या प्रशिक्षणात बियाणे निवड, जमीन मशागत, माती व पाणी व्यवस्थापन, तण, कीड व रोग व्यवस्थापन तसेच प्रक्रिया व मुल्यवर्धन आणि विपणन या विषयी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. विजू अमोलिक, वनामती नागपूरचे प्रशिक्षण समन्वयक सीमा मुंडले, रामेती नाशिकचे सहाय्यक संचालक शिलानाथ पवार, कडधान्य प्रकल्पाचे प्रमुख डॉ. नंदकुमार कुटे, मका पैदासकार डॉ. सोमनाथ धोंडे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.