आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन:टाटा हॅरियरच्या बदल्यात दिली चक्क नादुरुस्त ऑडी ; पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा हॅरिअर कार १४ लाख रुपयांना विकून त्याची कागदपत्रे न देता, तसेच कार परत घेऊन त्याबदल्यात नादुरुस्त ऑडी कार देऊन १४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीर मुस्ताक शेख (वय ३४, रा. मुकुंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. मोहम्मद असीफ मोहम्मद हनीफ शेख (रा. न्यु निलम बेकरी, आंबेडकर चौक, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक व वसीम मोहम्मद सादिक शेख (रा. बंगला न १७, पखाल रोड, भगवती मिल, नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ जुलै २०२० ते ८ जून २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. आरोपींनी टाटा हॅरीअर कार (एमएच ४१ एएस ९७८६) १४ लाख रूपयांना विकून फिर्यादीला तिची कागदपत्रे न देता फसवणक केली. फिर्यादीकडून ती कार पुन्हा घेवून ती दुसऱ्याच्या नावावर केली व फिर्यादीला १४ लाख रूपये परत न करता, त्या बदल्यात नादुरुस्त ऑडी कार (एमएच १४ एफएस ००९९) देऊन व्यवहारात १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा अर्ज पोलिस ठाण्यात देण्यात आला होता. या अर्जावर चौकशी होऊन सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...