आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांमध्ये भितीचे वातावरण:गायरानवरील अतिक्रमणधारकांना नोटीसा देत प्रशासनाकडून दिशाभूल

राहुरी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुसुचित जाती,जमाती,भूमीहीन शेतकरी यांचे गायरान वरील अतिक्रमणे नियमाकुल करण्याचे आदेश असताना देखील अशा लोकांना नोटीसा देऊन प्रशासनाकडुन दिशाभूल केली जात असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू आढाव, बाबा साठे,रोहिदास अढागळे यांनी निवेदनाद्वारे केला आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटवण्याबाबत नोटीसा निघाल्याने अशा जागेवर वर्षानुवर्षे वास्तव्य असलेल्या लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे राज्य शासन निर्णय २०११ नुसार अनुसुचित जाती,जमाती,भूमीहीन शेतमजुराचे अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबत निर्णय झाला असल्याने अशा रहिवाश्यांनाश नोटीसी देणे ही दिशाभूल आहे.

याबाबत रिपब्लिकन सेनेच्या वतीने हरकत घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार असल्याने संपर्क साधण्याचे आवाहन आढाव, साठे, अढागळे यांनी निवेदनात केले आहे. भूमीहीन शेतमजुर,अनुसुचित जाती,जमाती लोकांचे अतिक्रमणे निष्कासित करू नये हे शासन आदेश असल्याने असे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केल्यास संबंधिता विरूद्ध न्यायाल्याच्या आदेशाचा अवमान केल्याची याचिका दाखल करणार, असे राजू आढाव यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...