आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासन:आधार संकलनासाठी  प्रशासनाची तयारी; व्यक्तीचा आधार क्रमांक उपलब्ध

संगमनेर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदार संघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंद ओळखण्यासाठी आधार कार्ड नंबर संकलन केले जात आहे. १ एप्रिल २०२३ पर्यंत किंवा तत्पूर्वीच मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आधार क्रमांक उपलब्ध केला जाणार अाहे. यामुळे एकापेक्षा जास्त मतदारसंघात असलेल्या मतदार नोंदणीला आळा बसणार आहे.

मूळ गावात तसेच राहत असलेल्या शहरामध्ये दोन्ही ठिकाणी अनेकांचे मतदार यादीत नाव आहे. एकापेक्षा जास्त मतदार संघात एकाच व्यक्तीचे नाव असणे योग्य नसल्याने आधार कार्डचा क्रमांक मतदार क्रमांकाशी संलग्न करून अशी नावे शोधून एक ठिकाणावरून वगळली जाणार असल्याची माहिती संगमनेरचे निवडणूक नायब तहसीलदार विनोद गिरी यांनी दिली.

घरोघरी भेटी देऊन आधार क्रमांकाचे संकलन आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल, अ‍ॅपच्या माध्यमातून मतदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून आधार क्रमांक लिंक करू शकतात. अथवा प्रशासनाकडे अर्ज करुन आधार क्रमांक जमा करता येणार असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली. एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदार संघात तर एकापेक्षा जास्त मतदार संघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांसाठी बंधनकारक आहे.

बातम्या आणखी आहेत...