आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतसंस्था:खरवंडीच्या वसंतराव नाईक पतसंस्थेवर प्रशासक नियुक्त, सहायक निबंधक भारती काटुळे यांचे आदेश

पाथर्डी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील कै. वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी दोन सदस्यांच्या समितीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश येथील सहायक निबंधक भारती काटुळे यांनी दिले आहेत. सहकारी संस्थांचे उपलेखा परीक्षक पी. एल. पिसे यांची समितीचे अध्यक्ष म्हणून, तर सदस्यपदी अप्पर लेखापरीक्षक जे. बी. पातकळ यांच नियुक्ती करण्यात आली आहे.

खरवंडी कासार येथील कै.वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्थेच्या कामकाजाबाबत व संस्थेची मालमत्ता बेकायदेशीरपणे विक्री केल्याच्या तक्रारी लिंबाजी खेडकर यांनी केल्या होत्या, याची चौकशी सुरू करण्यात आली. संस्थेच्या मालमत्तेच्या विक्रीला सहायक निबंधक कार्यालयाची परवानगी आवश्यक असताना विक्री व्यवहार केल्याच्या गंभीर तक्रारी सभासदांनी केल्या होत्या. याबाबत चौकशी करून संस्थेवर प्रशासकाची निवड करण्यात आली. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७ अ (ब १)नुसार प्रशासकाची नियुक्तीचे आदेश सहायक निबंधक भारती काटुळे यांनी दिले आहेत.

ठेवीदारांनी ठेवीबाबत खातरजमा करावी
वसंतराव नाईक सहकारी पतसंस्थेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. मात्र, ठेवीदारांची दिशाभूल करण्यासाठी चेअरमन, व्हाईस चेअरमन व सचिव यांनी वसंतराव नाईक मल्टीस्टेट कंपनी स्थापन केली. ठेवीदारांनी आपल्या ठेवी वसंतराव नाईक मल्टीस्टेटमध्ये आहेत की वसंतराव नाईक सहकारी पतसंस्थेत आहेत याची खातरजमा करावी, असे एकनाथवाडी येथील लिंबाजी खेडकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...