आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव व देखावे:भव्य-दिव्य पौराणिक ,धार्मिक देखाव्याची परंपरा कौतुकास्पद; नरेंद्र फिरोदिया यांचे प्रतिपादन

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव व देखावे यांचे अतुट नाते आहे. नगरमध्ये गणेशोत्सवात भव्य दिव्य देखाव्यांची परंपरा आहे. यात नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळ कायम अग्रेसर राहिले आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीची वेगळी ओळख मंडळ दरवर्षी आपल्या देखाव्यातून करून देत असते. यंदा साकारलेला जागरण गोंधळ हा पौराणिक देखावा गणेशभक्तांचे आकर्षण ठरेल. दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सवाचा आनंद आपण सर्वजण घेत आहोत, असे प्रतिपादन जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी केले.

नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात १८ मूर्ती असलेला भव्य असा जागरण गोंधळ हा देखावा साकारला आहे. या देखाव्याचे उद्घाटनप्रसंगी फिरोदिया बोलत होते. यावेळी उद्योजक विक्रम फिरोदिया, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, सेक्रेटरी हेमंत मुथा, महिला अध्यक्ष सविता गुंदेचा तसेच राज मुनोत, आकाश चोपडा, शुभम गट्टाणी, अनुप मुथा, अंकित मुथा, सौरभ मुथा, पवन गुंदेचा, रोहन गट्टाणी, सोमेश मुथा, प्रसन्ना गांधी, रितिक मुनोत, कृष्णा दरक उपस्थित होते.शैलेश मुनोत म्हणाले, मंडळाने नेहमीच समाजाला चांगला संदेश देणारे देखावे सादर केले आहेत. दोन वर्षे कोरोना महामारीमुळे सगळेच जण देखाव्याच्या आनंदाला मुकलो. यंदा मात्र पुन्हा त्याच उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. गणपती हे बुध्दीचे दैवत आहे. देखावे पाहण्यासाठी यंदा विक्रमी गर्दी होणार असल्याने मंडळाने सर्वात लवकर देखावा खुला केला आहे. मंडळाचे कार्यकर्ते गर्दीचेही नियोजन करणार असून कोणत्याही गणेशभक्ताला त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. भाविकांनीही मंडळाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. आभार सविता गुंदेचा यांनी मानले. देखावा सर्वांसाठी खुला झालेला आहे.

गोंधळींची देवदेवतांना विनवणी
जागरण गोंधळ ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. यात गोंधळी देवदेवतांना विनवणी करीत असतात. सदानंदचा येळकोट, अंबाबाईचा उदे उदे, मार्तंड भैरवाचे चांगभले..जेजुरीच्या खंडेराया जागराला या, अशी गाणी व त्यानुसार मूर्तीची हालचाली देखाव्यात आहेत. वाघ्या मुरळी, भंडाऱ्याची उधळण, लग्नानंतर प्रथमच खंडोबा मंदिरात पत्नीला उचलून नेताना पतीदेव अशा सर्व परंपरा या देखाव्यातून जिवंत करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...