आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविश्वभारती अॅकेडमीचे तंत्रनिकेतमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रथम वर्ष डिप्लोमा इन इंजिनिअरिंगचे प्रवेश प्रक्रिया केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचा संकेत क्र.एफसी-५१७९ आहे. इ. १० वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगची केंद्रीयभुत प्रवेश प्रक्रिया २ जूनपासून सुरु झाली आहे. या प्रक्रियेमध्ये नावनोंदणी करण्यासाठी ३० जून ही अंतिम तारीख आहे.
या प्रक्रियेमध्ये नावनोंदणी करण्यासाठी इ.१० वी च्या निकालाची आवश्यकता नसून केवळ दहावी परिक्षेच्या बैठक क्रमांकावर डिप्लोमा इंजिनिअरिंगचा अर्ज भरता येईल. विश्वभारती तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रिया केंद्रामध्ये अद्यावत संगणक कक्ष असून, प्रवेश प्रक्रिये संदर्भात ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांची तपासणी व छानणी करणे, ऑपरेशन फॉर्म भरणे इत्यादीसाठी तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांची नेमणुक करण्यात आली आहे.
तरी इ.१० वी नंतर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छिणार्या विद्यार्थी व पालकांनी या मोफत प्रवेश प्रक्रिया केंद्राचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल ९०७५८२८०६७ या क्रमांकावर संपर्क साधावा. विश्वभारती तंत्रनिकेत (डिप्लोमा) हे अहमदनगर मधील एक नावाजलेले तंत्रनिकेतन असून, तांत्रिक शिक्षणामध्ये संस्थेचा नावलौकिका आहे. इ. दहावी नंतर डिप्लोमासाठी सिव्हील इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग हे कोर्सेस उपलब्ध असून, प्रत्येक कोर्सची प्रवेश क्षमता ही ६० आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.