आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्याकांड:नेवासे येथील ॲड. रियाज पठाण हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सुरू

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासा येथील बहुचर्चित ॲड. रियाज पठाण हत्याकांड प्रकरणी नगर येथील न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. मंगळवारी सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांनी न्यायालयात हजेरी लावून तीन साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. अण्णा लष्करे खून प्रकरणात आरोपींच्या बाजूने साक्ष दिल्याच्या कारणातून १६ सप्टेंबर २०१३ रोजी नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात ॲड. रियाज जमशेद पठाण यांची हत्या करण्यात आली होती.

याप्रकरणी बारा ते तेरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही आरोपींना जामीन मिळाला असला तरी बहुतांश आरोपी अद्यापही कोठडीतच आहेत.

या प्रकरणाची सुनावणी नगर न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश नाईकवाडी यांच्यासमोर सुरू झाली आहे. मंगळवारी सरकार पक्षाच्या वतीने ॲड. उज्वल निकम यांनी नेवासा येथील एक डॉक्टर, पोस्टमार्टम करणारे डॉक्टर व आणखी एका साक्षीदाराची साक्ष नोंदवली. याप्रकरणी पुढील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, सुनावणीवेळी आरोपींना विशेष पोलिस बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले होते. ॲड. पठाण हत्याकांड प्रकरणी सुनावणी सुरू झाली असून ती प्राथमिक टप्प्यात आहे. तीन साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या असल्याचे ॲड. उज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ॲड. निकम यांना ॲड. परिमल फळे यांनी सहाय्य केले.

बातम्या आणखी आहेत...