आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत वारंवार लेखी निवेदने देऊनही माथाडी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गोड बोलून प्रलंबित प्रश्नाला केराची टोपली दाखवली. ३ मार्च रोजी माथाडी कामगारांच्या मोर्चात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे आणि माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी असा आग्रह धरला. त्याची दखल घेत, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी तात्काळ बैठक बोलावली. बैठकीत विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून ते मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी दिली.
बैठकीस कामगार नाशिक विभागीय उपायुक्त विकास माळी, माथाडी मंडळाचे अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले, निरीक्षक सुनील देवकर, सचिव तुषार बोरसे, जगधने, काळे, कॉ. बाबा आरगडे, महामंडळाचे उपाध्यक्ष राजकुमार घायाळ, सचिव सुभाष लोमटे आदी उपस्थित होते. बैठकीत आवक वाराईचा २० वर्षांचा प्रश्न, महिलांची मजुरी, मार्केट कमिटीचे प्रशासकासोबत बैठक घेऊन आवक वाराईचा प्रश्न सोडविण्यात येईल. ठोक वाराई भराईचा नव्याने करार करतेवेळी इंडेक्स रक्कम वाढविण्यात यावी. अनोंदीत कामगारांची दखल माथाडी मंडळ घेत नाहीत, १ तारखेपासून अनोंदीत कामगारांची नोंदणी करण्यात येईल. माथाडी मंडळातून कामगारांना वेळेवर पगार १० तारखेपर्यंत खात्यावर टाकावा.
बिगर नोंदीत आस्थापना माथाडी मंडळात १ तारखेपासून नोंदीत करण्यात येतील. कामगारांचे इन्शुरन्स क्लेमबाबत संघटनेला विश्वासात घेऊन विमा कंपन्यांची निवड करण्यात येईल. ५० किलो वजनाची काटेकोर अंमलबजावणी करणे, कांदा मार्केट व भाजीपाला मार्केटमध्ये काम करण्याचे वेळेचे बंधन अत्यावश्यक आहे. रेल्वेस्टेशन मालधक्का येथील कामगारांना नागरी सुविधा तात्काळ देण्यात याव्यात. प्रचलित लेव्हीत वाढ करावी, आदी मागण्यांसंदर्भात दर ३ महिन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेण्यात येऊन शहानिशा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्याबद्दल हमाल पंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी सालीमठ यांचे आभार मानण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.