आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या योजनेसाठी पंतप्रधानांना साकडे:संजयनगर झोपडपट्टीतील परवडणाऱ्या घरांची बांगलादेशी पाहुण्यांना भुरळ

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील संजयनगर झोपडपट्टी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महानगरपालिका, स्नेहालय व करी स्टोन या संस्थेमार्फत, संजयनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत २९८ झोपडपट्टीतील कुटुंबांसाठी आदर्शवत घरकुल योजना राबविले जात आहेत. पहिल्या फेजमध्ये ३३ घरांची स्वप्नपूर्ती करत मार्च महिन्यात या लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली होती, या योजनेची माहिती संपुर्ण जगभर प्रसिद्ध झाल्याने या योजनेला भेट देण्यासाठी बांगलादेश येथील निवृत्त मेजर व इतर सहकारी नुकतेच नगरला आले. ही योजना संपूर्ण जगाला पथदर्शी असल्याचे ते म्हणाले.

जनरल दास यांच्यासोबत अध्यक्ष नौखाली गांधी आश्रम ट्रस्ट बांगलादेश, राहा नबाब कुमार संचालक गांधी आश्रम ट्रस्ट नौखाली बांगलादेश व ह्यूमन राईट कमिशन सदस्या बांगलादेशच्या तांदरा दीदी हेही आले होते. या घरकुल प्रकल्पाला भेट देऊन येथील नागरिकांशी व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद करून या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. ही माहिती समजून घेतल्यानंतर हा भारतातीलच नव्हें तर जगातील झोपडपट्टी मधील परवडणाऱ्या घरांचा एकमेव आदर्श गृहनिर्माण प्रकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.

अशाच प्रकारचे गृहनिर्माण प्रकल्प बांगलादेशमध्ये सुद्धा आम्ही आपल्या अहमदनगर महानगरपालिका व स्नेहालय यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पाहुण्यांचा स्वप्नपूर्ती घरकुल सोसायटीच्या वतीने अध्यक्ष विकास गवळी, उपाध्यक्ष नागेश अटक व सचिव श्रावण अटक यांनी सन्मान सत्कार केला. या संजयनगर घरकुलची माहिती देण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक शबाना शेख, समुदाय प्रतिनिधी ऋत्विक लोखंडे, कल्पना अटक व पूजा भंडारे आदि उपस्थित होते.

आमच्या देशातही निर्मिती व्हावी
निवृत्त मेजर दास यांनी संजयनगर झोपडपट्टीतील पुनर्वसन प्रकल्पाला भेट देऊन माहिती जाणून घेतल्यानंतर हा झोपडपट्टीमधील परवडणाऱ्या घरांचा जगातील एकमेव आदर्श गृहनिर्माण प्रकल्प असल्याचे नमूद केले. अशा प्रकारचा गृहनिर्माण सोसायटीचा प्रकल्प बांगलादेशमध्येही झाला, तर गरीबांना परवडतील इतक्या किमतीमध्ये घरे उपलब्ध होऊ शकतात, म्हणून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

झाेपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प
अहमदनगर महापालिकेच्या वतीने संजयनगर झाेपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवला जात आहे. याअंतर्गत २९८ घरकुलांचा उपक्रम राबवण्यात आला आहे. या याेजनेच्या पहिल्या टप्प्यात ३३ लाभार्थींना घरांचे वाटप करणयात आले. स्नेहालय अंतर्गत बांगलादेशी पाहुणे नगरला आले असता, त्यांना या उपक्रमाची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी हा प्रकल्प पाहण्याची इच्छा दर्शवली. कमी खर्चात ही घरकुलं साकारता येऊ शकतात, हे पाहून पाहुणे अचंबित झाले.

बातम्या आणखी आहेत...