आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीबाणी:3 महिन्यांपासून शेवगावकरांना मिळते 14 दिवसांनंतर पाणी; प्रशासकाचे हात वर, पाणी समस्या सोडवण्याची होतेय मागणी

शेवगाव शहर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी परिस्थिती सध्या शेवगावकरावर गेल्या तीन महिन्यांपासून ओढावली आहे. शेवगाव शहरात होणारा पाणीपुरवठा तब्बल १४ दिवसांनी होत असल्याने अनेक प्रभागातील नागरिक नगरपालिकेच्या नावाने शंख करताना दिसत आहेत. मात्र, सर्वसामान्य नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत असताना प्रशासकीय पातळीवर कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. शेवगाव शहराचा पाणी प्रश्न कोण सोडवणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये नगर पालिका व नगर प्रशासन यांच्या विरोधात तीव्र असंतोष आहे.

गेल्या तीन महिन्याभरापासून हीच परिस्थिती असल्याने पाणीपट्टी भरूनही जर १४ दिवसांनी पाणीपुरवठा होत असेल तर ती न भरलेली बरी असा सूरही नागरिकांतून उमटत आहे. नगरपालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी, चार दिवसाला का होईना पाणी येत होते. मात्र नगरपालिका झाल्यापासून किमान शेवगाव शहराला तीन दिवसाला पाणीपुरवठा होणे अपेक्षित असताना तो पाणीपुरवठा १४ दिवसांनी होत असल्याने नेमके शेवगावकरांना काय साध्य झाले हेही करताना दिसत नाही.

शेवगाव शहरात किमान चार दिवस आला पाणी द्यायला हवे, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. मात्र, पाणी पुरवठा योजनेच्या नवीन पाइपलाइनला निधी उपलब्ध होऊनही पाइपलाइनचे स्वप्नही शेवगावकरांसाठी बरोबर ठरले. शेवगाव शहर आज पाणी समस्येसाठी स्थानिक आमदार व प्रशासकीय पातळीवर कोणतीही ठोस उपाययोजना करताना सध्या तरी दिसत नाही. सर्वसामान्य मात्र मिळेल तिथून पाणी आणण्यात धन्यता मानतात. शेवगावकरांची पाणी समस्या कधी मिटणार व ती कोण मिटवणार याकडेच सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...