आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी दुर्घटना:दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला नगरमध्ये सुरुवात ; मोठी दुर्घटना टळली

नगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहर व परिसरात मंगळवारी दुपारी दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली.मंगळवारी सायकांळी अहमदनगर शहरातील पारीजात ते एकवीरा चौका दरम्यानच्या रस्त्यावर वादळामुळे झाड पडले. सुदैवाने या रस्त्यावरून कुणी जात नव्हते. त्यामुळे मोठी मोठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेत एक बालिका किरकोळ जखमी झाली आहे.शहरासह ग्रामीण भागात भागात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शहरात झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते.

नगर जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने चिंता वाढली होती. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या वर्षी १ जुन पासूनच मान्सूनचा पावसाला सुरुवात झाली होती. यंदा मात्र १ जून उलटल्यानंतर ७ जूनला जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह तुरळक व मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाला होता. त्यानंतर ११ जूनला जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली होती.

१ जून ते २० जून पर्यंत नगर जिल्ह्यात केवळ दोन दिवसच पाऊस झाला होता. मंगळवारी दुपारी शहरातील सावेडी, पाइपलाइन रोड, तपोवन रोड, औरंगाबाद रोड, प्रोफेसर कॉलनी यासह शहरातील दिल्लीगेट, सर्जेपुरा या भागात पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते, या पाणी साचलेल्या रस्त्यावरून वाहने काढण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागली.

प्रतीक्षा दमदार पावसाची अहमदनगर शहर व जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. तरी काही भागात हलका पाऊस झाला असला तरी ग्रामीण भागात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...