आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर:एमआयआरसी प्रशिक्षण पूर्ण करून 106 जवानांनी आज घेतली देशनिष्ठेची शपथ

अहमदनगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय लष्करातील महत्त्वाची प्रशिक्षण संस्था असलेल्या अहमदनगर येथील मेकॅनाइज्ड रेजिमेंटल सेंटरमधील (एमआयआरसी ) प्रशिक्षण पूर्ण करून 106 जवानांनी आज देशनिष्ठेची शपथ घेतली. ब्रिगेडियर रसेल डिसुझा यांनी संचलनाची मुख्य सलामी स्वीकारली आणि संचलनाची पाहणी केली. त्यांनी यावेळी प्रशिक्षणार्थी यांनी कर्तव्य आणि प्रामाणिक भावनेतून देशसेवा करण्याचे आवाहन केले.

आज शपथग्रहण सोहळ्याच्या वेळी शानदार संचलन करत जवानांनी उपस्थितांची मने जिंकली. लष्कराच्या बँडपथकाने सादर केलेल्या धूनवर जवानांचे आगमन झाले. ब्रिगेडियर रसेल डिसुझा यांनी संचलनाची मुख्य सलामी स्वीकारली आणि संचलनाची पाहणी केली. त्यानंतर एमआयआरसी संस्थेने लष्करासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना प्रदान करण्यात आलेले निशाण (ध्वज) आणण्यात आले. धर्मगुरुंनी जवानांना कर्तव्यासाठी निष्ठा आणि समर्पणाची शपथ दिली.

प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणारा फॉक्सट्रॉट ट्रेनिंग कंपनीचा सुक्रीप थापा बेस्ट रिक्रुट ठरला. त्याचा 'जनरल सुंदर जी गोल्ड मेडल' देऊन गौरव करण्यात आला तर, अल्फा ट्रेनिंग कंपनीचा रिक्रुट विशाल खारका याचा 'जनरल के. एल. सिल्वर मेडल' आणि ब्राव्हो ट्रेनिंग कंपनीचा रिक्रुट शुभम बंडोपंत पाटील यास 'जनरल पंकज जोशी कांस्यपदक' देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी या कोविड नियमांचे पालन करून पालकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...