आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआठ वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यातील गावांगावात पाणीटंचाईचे भीषण संकट होते. गावात एक टँकर आला की लेकराबाळांसह महिला, पुरुष, वृद्धांचा अवघ्या हंडाभर पाण्यासाठी टँकर भोवती गराडा असायचा. पाण्यासाठी एकमेकांवर लोक धावून जायचे. आता मात्र आठ वर्षानंतर हे चित्र बदलले आहे. आठ वर्षांपूर्वी जिल्ह्यातील १४ तालुक्यात तब्बल ४४३ गावे व २ हजार ४७८ वाड्या-वस्त्यांवरील तब्बल ११ लाख ४३ हजार १७२ नागरिकांना ७२३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. आता मात्र गेल्यावर्षी सरासरीपेक्षा झालेला अधिक पाऊस व जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या कामामुळे नगर जिल्ह्यातील १२ तालुके टँकरमुक्त झाली आहेत.
राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा नगर जिल्हा आहे. दक्षिण व उत्तर अशा दोन भागात जिल्ह्याचा विस्तार आहे. दक्षिण जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर उत्तर हा बागायती जिल्हा म्हणून ओळखला जातो. नगरच्या दक्षिण जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, नगर, पारनेर, श्रीगोंदे हे कायम दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात. गेल्या ४५ वर्षापासून कायम टंचाईच्या झळा सोसणाऱ्या या तालुक्यांना प्रथमच यंदा दिलासा मिळाला आहे. सर्वाधिक पाणी टँकर याच सात तालुक्यात दरवर्षी सुरू असतात.
यंदा मात्र पाण्याबाबत मोठा बदल या तालुक्यांत झाला आहे. ४ मे २०१४ ला (सात वर्षांपूर्वी) दुष्काळी भागातील तालुक्यांना सर्वाधिक पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. या कालावधीत सर्वाधिक पाणी टँकर हे पाथर्डी तालुक्यात सुरू होते. पाथर्डी तालुक्यातील ५४ गावे ३६३ वाड्या-वस्त्या वरील १ लाख ५९ हजार ९०१ नागरिकांना ११४ टँकरने पाणीपुरवठा केला जात होतो.
पाथर्डीसह शेवगाव, जामखेड, कर्जत, नगर, पारनेर, श्रीगोंदे या दक्षिण जिल्ह्यासह संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्यातही त्यावेळे टँकर सुरू होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.