आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी उत्पन्न बाजार समिती:भाव न मिळाल्याने कोथिंबिरीच्या जुड्या दिल्या फेकून

नगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे हातात आलेले भाजीपाल्याचे पीक सडण्याच्या मार्गावर आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समिती कोथिंबीरला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी सोमवारी बाजार समितीच्या आवारातच कोथिंबिरीच्या जुड्या फेकून दिल्या.

नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या दोन आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू होता.गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात पालेभाज्या विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन येत आहेत. बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून अत्यंत कमी दराने पालेभाज्याची खरेदी होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सोमवारी अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात पालेभाज्याची आवक झाली.

प्रामुख्याने कोथिंबीर व मेथीची आवक मोठ्या प्रमाणात होती. मात्र कोथिंबीर जुडी १ ते ५ रुपये दराने शेतकऱ्यांना विकावी लागली. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कोथिंबीर आणूनही त्याला चांगला भाव न मिळाल्याने ती कोथिंबीर बाजार समितीच्या आवारातच फेकून दिली. मेथीला देखील अत्यंत कमी प्रमाणात भाव मिळाला.

भाजीपाल्यासह फळभाज्यांची आवक वाढली
नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू या भाजीपाल्यासह शिमला मिरची, शेवगा, टमाटर, भोपळा, दोडकी या फळभाज्याचीही मोठ्या प्रमाणात आवक होती. भाजीपाल्याच्या तुलनेत फळभाज्यांना चांगली मागणी होती. फळभाज्यांचे भावही स्थिर होते.

बातम्या आणखी आहेत...