आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक विधी पार पाडले:बैलाच्या मृत्यूनंतर शेतकऱ्याने धार्मिक पद्धतीने केला दशक्रिया विधी

श्रीगोंदे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्या प्राण्यावर जीव लावणारे शेतकरी कमी नाहीत, अशीच घटना भावडी ता. श्रीगोंदे येथे घडली. भोसले या शेतकऱ्याकडे असणारे बैल जोडीवर या कुटुंबाच जीवापाड प्रेम असल्याने या बैलजोडीतील देवमन नावाच्या बैलांच्या मृत्यूनंतर या भोसले कुटुंबाने या बैलांच्या अंत्यसंस्कारापासून ते दशक्रिया विधी पर्यंतचे सर्व धार्मिक विधी पार पाडले.भावडी मधील नवनाथ भोसले या शेतकऱ्याकडे घरच्या गाईला १९९८ मध्ये गोऱ्हा झाला. त्याचे नाव देवमन ठेवले. या बैलांच्या जन्मापासून या कुटुंबाची आर्थिक भरभराट झाली.

या बैलामुळे शेतीची चांगल्या प्रकारे मशागत करायला देवमन च्या जोडीसाठी त्याचाच मामा बैल पोपट्या या दोघांची एवढी मोठी साथ होती. यातून घरची परिस्थिती सुधारणा करत नवनाथ भोसले यांनी आपला मुलाला उच्च शिक्षण देत वन अधिकारी बनवले. देवमन बैल मालक घरी येईपर्यंत खाली बसत नसायचा. भोसले यांनी देवमन बैल जाण्याच्या अगोदर त्याला तीन ते चार वर्ष कोणतेही प्रकारचे शेतीतले काम करू दिले नाही एखाद्या वृद्ध माणसाप्रमाणे भोसले कुटुंबाने त्याचा सांभाळ केला.

आपल्या जोडीदार बैलाच निधन झाल्यानंतर आपला मित्र गेल्याने देवमन बैल हा माणसाप्रमाणे रडत होता.असे भोसले कुटुंबाने सांगितले त्यानंतर २ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी देवमन बैल बसला रात्री नियमित आपल्या वाट्याचा घास खाऊन त्रास न देता देवमन चा मृत्यू झाला. वयाच्या २४ व्या वर्षे पूर्ण झाले होते. या देवमन बैलांच्या ऋणमुक्त होण्याकरता उतराई होण्याकरता ११ सप्टेंबर रोजी संत कृपा निवासस्थानी ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले. त्याच ठिकाणी देवमन बैलाचा दशक्रिया विधी केला गेला.

रवींद्र महाराज सुद्रिक यांचे प्रवचन झाले. तालुक्यातील काही मंडळी तसेच त्यांचे जवळचे नातेवाईक अंत्यविधी आणि दशक्रिया विधीला उपस्थित होते. भावडीचे ग्रामस्थ शांतीलाल भोस, अमृत पांडुळे ग्रामपंचायत सदस्य, शांतीलाल कोरडकर भावडी विकास सेवा सहकारी सोसायटी चेअरमन, दत्तात्रय भोसले, रावसाहेब भोसले, विठ्ठल भोस, अंबादास भोस, भाऊसाहेब रोकडे गुरुजी, अमोल रोकडे, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.देवमन बैलाचा संभाळ नवनाथ भोसले यांच्या पत्नी शोभा भोसले यांनी केला मुलाप्रमाणे त्यांनी त्याला सांभाळले. त्यांना देवमनची आठवण झाली तर त्या गोठ्यात बैल बांधलेल्या जागेवर जाऊन त्याची आठवण काढतात.

बातम्या आणखी आहेत...