आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:पंजाबमधील यशानंतर जामखेडमध्ये आप च्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

जामखेड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशानंतर जामखेड आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांची चर्चा देशभर आहे. पाच राज्यांपैकी 4 राज्यांमध्ये भाजप आघाडीवर आहे तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष बहुमताने सत्तेत येणार असल्याने कार्यकत्यांनी जल्लोष साजरा केला. जामखेड शहरात नगर रोड, खर्डा चौक, बीड रोड कॉर्नर, मेनरोड, जिजाऊ नगर आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर तोफा वाजून व घोषणा देऊन, तसेच पेढे भरवून आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. या वेळी आम आदमी पार्टीचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष संतोष नवलाखा, जामखेड तालुका अध्यक्ष बजरंग सरडे, अजय भोसले, अॅड. बिपिन वारे, संपत सुर्वे, गणेश कोळपकर, नागेश राऊत, सुंदर परदेशी, रहीम रईस बागवान, नंदु गंगावणे, स्वानंद कुलकर्णी, बागवान आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...